Satara Accident : कास पठाराहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कारला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

Satara Accident : सातारा शहरानजीकच्या कास पठारकडे जाणा-या रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात दाेन जण ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सातारा तालुका पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनूसार कास पठाराहून सातारा शहराकडे जात असताना एका कारचा अपघात झाल्याचे ग्रामस्थांना पाेलिस ठाण्यात कळविले. अपघातग्रस्त कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. संबंधित कार रस्त्यालगत असणाऱ्या सुरक्षा कठड्याला धडकली. त्यामुळे कारचे माेठं नुकसान झाले आहे.

Pune Traffic News : पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; जड वाहनांना नो एन्ट्री, वाचा पर्यायी मार्ग कोणते

या अपघातात दाेघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तसेच तिघे जण गंभीर जखमी झालेत. सातारा शहरातून काहींनी रुग्णवाहिका आणून जखमींना रुग्णालयात नेले. दरम्यान अपघाताची माहिती कळताच अपघातग्रस्त व्यक्तींचे परिचित तसेच नातेवाईक घटनास्थळाचे चित्र पाहताच त्यांनी आक्राेश केला. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply