Sasoon Hospital : पारदर्शी व्यवस्था उभारण्यावर राहणार भर; डॉ. चंद्रकांत म्हस्के

Sasoon Hospital : अल्पवयीन आरोपीचे रक्तनमुन्यांमध्ये झालेल्या अदलाबदलीच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयात पारदर्शी व्यवस्था उभारण्यावर भर देण्याचा निर्धार बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे नवीन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न ससून रुग्णालय गेल्या वर्षभरापासून एकामागून एक भयंकर घटनांनी हादरले आहे. या पार्श्वभूमीवर तत्कालीन अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले. त्यामुळे या रिक्त झालेल्या पदाचा अतिरिक्त कार्यभार बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. म्हस्के यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांनी गुरुवारी दुपारी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर हा निर्धार व्यक्त केला.

Pune Porsche Accident Case : नाव काळेंचं, काम मुश्रीफांचं?; तावरेला वाचवणारे मोकाट, काळे सक्तीच्या रजेवर

डॉ. मस्के यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर रुग्णालयात फिरून आढावा घेतला. त्यानंतर महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलविली. त्यात पारदर्शी आणि निःपक्षपाती व्यवस्था उभारण्यावर भर देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. म्हस्के म्हणाले “रुग्ण हाच ससून रुग्णालयाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे त्यालाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी सध्याच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करून सक्षम व्यवस्था निर्माण करण्यात येईल. रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यात येणारा प्रत्येक अडथळा दूर करण्यात येण्यात येईल. मनुष्यबळाची कमतरता हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येतील."

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय हे संशोधनासाठी प्रख्यात आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि डॉक्टरांना संशोधनास प्रोत्साहन मिळेल, असे वातावरण निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply