Santosh Deshmukh Case : वाल्याला फाशी झालीच पाहिजे, मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक; धनंजय देशमुखांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

Santosh Deshmukh Case : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थ देखील दुसऱ्या पाण्याच्या टाकीवर चढले असून आरोपींना फाशी द्या अशी घोषणाबाजी करत आहेत. संतोष देशमुखांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. घटनास्थळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आले आहेत.

मस्साजोग गावातील ग्रामस्थांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. धनंजय देशमुख हे देखील पाण्याच्या टाकीवर चढले आहेत. आंदोलनावेळी धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले. धनंजय देशमुख यांच्यासह पाण्याच्या टाकीवर ३ जण चढले आहेत. तर गावातील इतर तरुण हे दुसऱ्या पाण्याच्या टाकीवर चढले आहेत. धनंजय देशमुख त्यांचे साडू दादा खिंडकर आणि अन्य काही नातेवाईक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी धनंजय देशमुख यांना भोवळ आली.

मस्साजोग गावातील दोन पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. धनंजय देशमुख हे सकाळी अचानक गावातून बाहेर पडले होते. त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. आता या आंदोलनात महिला देखील सहभागी झाल्या आहेत. त्यांनी पाण्याच्या टाकीखाली बसून आंदोलन सुरू केले आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Sangli Crime : पद्मावती मंदिरातील चोरीचा उलगडा; चोरट्यास ताब्यात घेत साडेनऊ लाखांचे दागिने हस्तगत

आंदोलनकर्त्या महिलांनी आरोपीला फाशी द्या असी मागणी केली आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. आमचं पूर्ण गाव गेलं तरी चालेल आम्ही आरोपीला शिक्षा देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. वाल्मिक कराडविरोधात मोक्का लावा आणि त्याला फाशी द्या अशी मागणी महिलांनी केली आहे. खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला का सोडताय? त्याच्याविरोधात ३०२ चा गु्न्हा दाखल करून त्याला फाशी द्या अशी मागणी महिला आंदोलकांनी केल्या आहेत.

मनोज जरांगे पाटील हे आंदोलनस्थळी पोहचले आहेत. त्यांनी आम्ही देशमुख कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत असे सांगितले. असं खचून चालणार नाही. आम्ही देशमुख कुटुंबीयांच्यासोबत आहोत. धनंजय देशमुखांनी पाण्याच्या टाकीवरून खाली यावे असे आवाहन जरांगेंनी केले. आंदोलन स्थळी पोलिस दाखल झाले आहेत. पोलिसांनी आंदोलकांना खाली उतरण्यास सांगितले. अतिरिक्त पोलिस अधिक्षक चेतना तिकडे देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलिसांकडून धनंजय देशमुखांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply