Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड अटकेत, सुदर्शन घुले देशाबाहेर पसार? शेवटचं लोकेशन आलं समोर

Beed Sarpanch Murder Case News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या शोधासाठी सात पदके विविध राज्यासह देशभर रवाना झाली आहेत. सराईत गुन्हेगार असल्याने एक वेळ तो नेपाळलाही गेल्याची हिस्ट्री समोर आली आहे. नेपाळमध्ये त्याचं शेवटचे लोकेशन स्ट्रेस झाल्याचे तपासात समोर आलेय. सुदर्शन देश सोडून गेला आहे का? याचा तपासही सीआयडी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले यांच्या शोधासाठी सीआयडीने 7 पथके विविध राज्यासह देशभर रवाना केली आहेत. या अगोदर सुदर्शन घुले हा अनेक गुन्ह्यामध्ये आरोपी आहे. तसेच एका गुन्हा संदर्भात फरार असताना तो नेपाळला गेल्याचे देखील माहिती आहे. त्यामुळे पुन्हा तो नेपाळला जाऊ शकतो का? या संदर्भात सीआयडीला संशय आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील सीआयडी तपास करत आहे. फरार असलेले तीन आरोपी यांना अटक करण्याच्या दृष्टिकोनातून सीआयडीने आता तपासाचा फास आवळला आहे.

एसआयटी आज बीडमध्ये दाखल होणार..

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन केलेली एसआयटीची आज बीड जिल्ह्यात दाखल होणार आहे. आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात १० जणांची टीम या प्रकरणाचां सखोल तपास करणार आहे. एसआयटीच्या स्थापनेनंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. आज बसवराज तेली आणि त्यांची टीम बीडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे..

Jawhar News : प्रसूतीदरम्यान माता व बाळाचा मृत्यू; जव्हार उपजिल्हा रुग्णालयात आठवडाभरात चौथी घटना

अशी असेल एस आय टी

- आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली - पोलीस उपमहानिरीक्षक

- अनिल गुजर - पो. उप अधीक्षक

- विजयसिंग शिवलाल जोनवाल- स.पो. निरीक्षक

- महेश विघ्ने - पो.उ.निरीक्षक

- आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक

- तुळशीराम जगताप - सहा. पो. उ. निरीक्षक

- मनोज राजेंद्र वाघ - पोलीस हवालदार

- चंद्रकांत एस.काळकुटे - पोलीस नाईक

- बाळासाहेब देविदास अहंकारे - पोलीस नाईक

- संतोष भगवानराव गित्ते - पोलीस शिपाई

बीड शहर पोलीस ठाण्यात आणलेल्या नव्या कॉट(पलंग ) आणखीही पोलीस स्टेशन बाहेरच आहेत..

बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये सीआयडीच्य कोठडीत वाल्मीक कराड याला ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी अर्थात बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे.. काल बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी येथे पाच पलंग आणि बेड आणण्यात आल्या आले.. मात्र यावर रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून आत्ताच कॉट आणि बेड कसे मागवले गेले ? असा प्रश्न उपस्थित केला, यासोबतच रोहित पवार यांनी या पोलीस स्टेशनमध्ये आता एसी सुद्धा बसून घ्या, असा खोचक टोला लगावला आहे. या कॉटची कालपासून चर्चा होत आहे. काल पाच आणलेले कॉट आज चारच आहेत.. यावर आता चर्चा होऊ लागली आहे..

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply