Sanjay Raut - Raj Thackeray : मिमिक्री पाहायची असेल तर जॉनी लिव्हरची बघू, ओरिजिनल; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Sanjay Raut - Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गट अध्यक्षांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मिमिक्री करत टीका केली होती. त्या टीकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी थेट नाव न घेता उत्तर दिलं आहे. राजकारण ही मिमिक्री नाही. आम्हाला ओरिजिनल मिमिक्री बघायची असेल तर ती आम्ही जॉनी लिव्हरची बघू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

 
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंवर टीका करून तुमचे राजकारण किती काळ चालणार आहे, असा सवालही त्यांनी विचारला. मी एका पक्षाचं नाव घेत नाही. त्यापेक्षा काही विधायक कामे करा. संघटनात्मक कामे करा. जशी आम्ही करतो आहोत. आमच्या पक्षावर इतकी संकटे आली आहेत. तरीही आम्ही कामे करतोय. लढतोय, असंही राऊत म्हणाले.
 
ज्यांनी आमच्यावर टीका केली, करताहेत, त्यांनी बुलडाण्याची सभा बघायला हवी होती. उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकायला हवे होते. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अख्खा बुलडाणा रस्त्यावर उतरला होता हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे, असंही ते म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांच्यावर होणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं जी मेहनत आणि कष्ट घेतले, ते त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी चार दिवस घेऊन दाखवावेत, असेही राऊत म्हणाले.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *