Sanjay Raut on Mohit Kamboj : 'बारमध्ये रात्री 3 वाजता भाजप नेत्याने घातली पोलिसांशी हुज्जत', राऊतांचा खळबळजनक दावा, थेट फडणवीस यांना लिहिलं पत्र

Sanjay Raut on Mohit Kamboj: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ट्विटने सध्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. संजय राऊत आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्वीट करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक बडा भाजप नेता असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट केलेला व्हिडीओ हा पहाटे साडेतीन वाजताचा असल्याचं सांगून कायद्याचे धिंडवडे उडवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत असलेले भाजप नेते हे मोहित कंबोज असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं आहे. जे त्यांनी ट्विटरवर शेअर केलं आहे.

Sanjay Raut on Mohit Kamboj: संजय राऊत यांनी पत्रात काय लिहिलं?

देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात संजय राऊत म्हणाले की, ''मुंबईत रेस्टॉरंट बार साधारण १ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी असताना सदर 'रेडिओ' बार हा पहाटे ३. ३० वाजेपर्यंत चालू होता व आतील धिंगाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात त्रास होऊ लागला. बाहेर ट्रैफिक जाम झाले म्हणून संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे हे आत जाऊन विनंती करू लागले. तेव्हा त्यांच्यावरच जबरदस्ती व धक्काबुकीचा प्रयत्न झाला. बारमध्ये मोठ्या प्रमाणात मुली होत्या व त्यांच्या गराड्यात भाजपचे एक तरुण नेते मोहित कंबोज हे मद्यधुंद अवस्थेत होते.

राऊत यांनी पुढे लिहिलं आहे, ''कांबळे यांनी पोलिसांना पाचारण केले, पण मोहित कंबोज हे वर्दीतल्या पोलिसांशी दादागिरीच्या भाषेत अर्वाच्य पद्धतीने बोलू लागले. काही पोलिसांना धमक्या दिल्या. "हिमत असेल तर मला येथून बाहेर काढून दाखवा. मी आता देवेंद्रला फोन करतो बघा," असे तो राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावाने धमकावू लागला व पोलीस हतबलतेने हा सर्व तमाशा अपमानित होऊन पाहत राहिले. पोलिसांसमोर कंबोज हे त्याही अवस्थेत दारू पित राहिले.

पात्रता राऊत यांनी लिहिलं, ''याबाबतचे हॉटेल व बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज त्वरित पोलिसांनी जप्त करावेत. कम्बोज हे वारंवार देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांचा उल्लेख करीत असल्याने पोलीस दबावाखाली आले. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर आहे. महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या नावाने मोगलाई सुरू असल्याचे दिसून येते. रेडिओ' बार हा अंमली पदार्थांचे सेवन, विक्री तसेच पिकअप पॉइंट म्हणून कुप्रसिद्ध आहे.''

'शनिवारी पहाटेपर्यंत येथे बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांचे सेवन, विक्री सुरू होती व भाजपचे एक नेते तेथे मद्यधुंद अवस्थेत उपस्थित होते व गृहमंत्र्यांच्या नावाने पोलिसांना धमकावत होते. ही बाब गंभीर आहे. खार पश्चिमेचा 'रेडिओ' बार कोणाच्या मालकीचा आहे, त्याचा तपास करून पोलिसांना धमकावणाऱ्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई व्हावी व नियम मोडणाऱ्या संबंधित 'रेडिओ बारचा परवाना रद्द करावा.'', असं ते म्हणाले आहेत.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply