Sanjay Raut : नवनीत राणांवरील टीका संजय राऊतांना भोवणार? महिला पदाधिकाऱ्यांनी उचललं मोठं पाऊल

Sanjay Raut : अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर केलेली टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना चांगलीच भोवण्याची शक्यता आहे. कारण, युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात गाडगे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर केलेली टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना चांगलीच भोवण्याची शक्यता आहे. कारण, युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात गाडगे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Mumbai News : बोगस डॉक्टरने केला तरुणीवर बलात्कार, नालासोपार्‍यातील घटनेने खळबळ

"ज्‍या बाईने हिंदुत्‍वाविषयी अपशब्‍द वापरले, मातोश्रीला आव्‍हान देण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍या बाईचा पराभव करणे हे शिवसैनिकांचे पहिले आणि नैतिक कर्तव्‍य आहे. तिच्या पराभवात शिवसेनेचे योगदान मोठे असलं पाहिजे, हा बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश असल्याचे लक्षात ठेवा", असंही राऊत म्हणाले होते.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकारी चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी राऊतांविरोधात गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply