Sanjay Raut : महाविकास आघाडीचं ठरलं! जयंत पाटलांची 'मातोश्री'वर बैठक; राऊतांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला

Sanjay Raut : आगामी लोकसभा निवडणुकांचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. लोकसभा निवडणूकांच्या दृष्टीने महायुती तसेच महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्या जागा वाटपावरुन वाद- विवाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर राऊतांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट झाल्याचे सांगितले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद आहेत, धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र तसे अजिबात नाही.तीनही पक्षात जागा वाटपा संदर्भात समन्वय आहे.." असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Kolhapur Crime News : संतापजनक! शरीरसंबंधास नकार दिल्याने महिलेची हत्या; मृतदेह ऊसाच्या फडात फेकला, नराधमास अटक

तसेच "महाराष्ट्रात ज्या ४८ जागा आहेत. त्या जागांचे वाटप मेरिटनुसार होईल. जो जिंकेल त्याची जागा हे आमचे सुत्र राहिलं असे संजय राऊत म्हणाले. तसेच शिवसेनेची भूमिका पहिल्यापासून 23 जागांवर लढण्याची राहिली आहे. एखाद्या जागे संदर्भात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा दावा मजबूत असेल तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते.." असेही राऊत यावेळी म्हणाले.

वंचितचाही इंडिया आघाडीत समावेश?

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीमध्ये समावेश होणार असल्याचे संकेत दिले. "याबाबत आमची दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी ची युती झालेली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अशी कुठलीही भूमिका नाही की वंचित आपल्या सोबत येऊ नये. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचे देखील तेच म्हणणं आहे.." असे संजय राऊत यावेळी म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply