Sangli News: अल्लड वयातलं प्रेम, एकांतातली भेट आणि प्रेयसीची निघृण हत्या; सांगलीतल्या घटनेनं महाराष्ट्र हादरला

Sangli News : प्रेमप्रकरणातून 21 वर्षीय तरुणीला तिच्या 21 वर्षीय प्रियकराने संपवल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत घडलाय. कॉलेजला गेलेल्या अक्षताचा मृतदेह कॉलेजपासून काही अंतरावर एका सुमसान जागेवर आढळला. अक्षताच्या प्रियकराने तिला संपवल्याची खुद्द कबुली दिलीये. हत्येच कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये. पोलिस पुढचा तपास करतायेत.

अल्लड वयात प्रेम केलं. याच प्रेमाने तीचा घात केलाय. ज्याने जिवापाड प्रेम केलं. तिचा होकार मिळवायला नको नको त्या शक्क्ल लढवल्या. त्यानेच तिच्या तोंडात बोळा कोंबला. तीचा गळा आवळला आणि तिला कायमचं संपवलं एकांत शोधून प्रेमाच्या आणाभाका घेण्याऐवजी त्याने एकांतात तीचा कायमचाच काटा काढला.

Baramati News : पुरंदर सिंचन योजनेच्या कार्यालयातच पेटविली चूल; पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

सांगलीतल्या भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक आणि शॉकिंग हत्याकांडाने महाराष्ट्र हादरलाय. पोरकट वयातलं प्रेम कोणत्या थराला जाऊ शकतं? आपल्या मनासारख नाही घडलं, म्हणून काळीजच काळजाला कसं काय संपवू शकतं? अशा कितीतरी प्रश्नांचा उद्रेक या घटनेमुळे घडलाय.

माणूस तरतो प्रेमात पडल्यावर, कवी आबेद शेख यांच्या ओळी बदलून, माणूस मरतो आणि मारतो प्रेमात पडल्यावर, असं म्हणायला भाग पाडणारी ही घटना आहे. 21 वर्षांचा प्रियकर आपल्या 21 वर्षांच्या प्रेयसीला एकांतात भेटायला बोलावतो. दोघांची भेट होते. भेटीत नेमकं असं काही घडतं, प्रियकर एकटाच परततो, प्रेयसी त्याच जागेवर निपचित मरुण पडलेली असते आणि तिला मारणारा दुसरा तिसरा कुणी नसून, तिला एकांतात भेटायला बोलवणारा खुद्द तिचा प्रियकरच असतो.

21 वर्षीय अक्षता कोरे आणि 21 वर्षीय निखील कांबळे. दोघेही समवयीन, अल्लड वयात दोघांना एकमेकांवर प्रेम झालं. अक्षता ही बी.ए फर्स्ट इयरची विद्यार्थीनी. म्हणजे नुकतीच महाविद्यालयीन आयुष्य जगणारी तरुणी. अक्षताने तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवला. पण आईवडिलांसाठी लेक अजूनही लहानच.म्हणून अक्षताचे वडिल रोज तिला कॉलजेला सोडायचे. अशातच 11 मार्च 2024 चा दिवस उजाडला.

अक्षताच्या वडिलांनी तिला कॉलेजच्या गेटवर सोडलं आणि ते माघारी निघाले. सकाळी कॉलेजला सोडलेल्या मुलीला वडिल पुन्हा दुपारी साडे बारा वाजता कॉलेजला घ्यायला आले. पण त्यांना अक्षता दिसलीच नाही. वडिलांनी शोधाशोध सुरु केली.

जिकडे जिकडे शक्य असेल तिकडे तिच्या वडिलांनी विचारपूस केली. पण अक्षताचा पत्ता लागला नाही. अक्षताला शोधत शोधत दुपारचे तीन वाजले. आता पोलिसात जाऊन तक्रार करायचा अक्षताच्या वडिलांनी विचार केला. पण अशातच त्यांना कानावर एक बातमी आदळली. ही बातमी ऐकून तो बाप पार खचला. त्याच्यावर जणू आभाळच कोसळलं होतं.

कॉलेजला गेलेल्या अक्षताचा कॉलेजपासून काही अंतरावर, एका पडक्या आणि सुमसान खोलीत मृतदेह आढळला होता. मृतदेह मिळताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरु केली. कॉलेजला गेलेली अक्षता इथं सुमसान जागेवर पोहचलीच कशी? तिला कुणी जबरदस्ती आणलं का? की ती स्वत: आली? अशे अनेक प्रश्न पोलिसांसमोर आ वासून उभे होते. याच चौकशीदरम्यान निखील कांबळे हे नाव पोलिसांच्या समोर आलं आणि या घटनेचा सगळा घटनाक्रम समोर आला.

निखीलने प्रेमप्रकरणातून अक्षताला संपवल्याचं स्वत: कबुल केलं. त्याने तिचा गळा आवळला. तिचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून त्याचे तिच्या गळ्यात बोळाही कोंबला. शेवटी तिच्या डोक्यात भलामोठा दगड टाकून निखिलने अक्षताला कायमचं संवपलं. जिच्यावर प्रेम केलं, तिलाच निखिलने निर्घृणपणे संवपल्याचं सांगितलं. पण निखिलने असं का केलं? नेमकं अक्षता आणि निखिल यांच्यात काय भिनसलं होतं? याबाबत पोलिसांना माहिती मिळाली नाही.

निखीलचं अक्षतावर एकतर्फी प्रेम होतं का?

की दोघांचं एकमेकांवर जिवापाड होतं?

अक्षता त्या सुमसान जागेवर कशी पोहचली?

तिच्या मर्जीने गेली? की तिच्यावर बळजबरी झाली?

प्रेम असूनही निखिलने असं अघोरी कृत्य का केलं?

पोलिस आता अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधतायेत. पण, तुम मेरी नही तो किसी की नही. निखीलच्या आणि निखीलसारख्या कित्येकांच्या या विकृत मानसिकतेला काय म्हणावं? तिच्या वाटेवर आयुष्यभर डोळे लावून बसणारं पवित्र प्रेम, तिची वाट लावण्यापर्यंत कसं काय पोहचलं? अल्लड वयात इतकी क्रुरता आलीच कशी? हे प्रश्न खरच विचार करायला भाग पाडणारे आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply