Sangli : ED चे पथक सांगलीत, बड्या व्यावासियाकाच्या बंगल्याबाहेर CRPF चे जवान तैनात

Sangli : सांगली शहरात आज (शुक्रवार) सकाळी ईडीचे दोन पथकं दाखल झाली आहेत. ही पथकं शिवाजीनगर मधील पारेख बंधू यांच्या दोन बंगल्यात गेली आहेत. तेथे ईडीचे अधिकारी काही जणांची चौकशी करत आहेत. सध्या काेणत्याही तपशिल माध्यमांना देण्यास अधिका-यांनी नकार दिला आहे. 

पारेख हे सांगलीतील बडे व्यावसायिक आहेत. त्यांचा शिवाजीनगर परिसरात बंगला आहे. या बंगल्यात आज ईडीचे पथक पहाटेच्या सुमारास चाैकशीसाठी आले. या बंगल्याबाहेर सीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

ईडीचे अधिकारी सांगलीत आलेत ही बातमी शहरात वाऱ्या सारखी पसरली. शिवाजीनगर मधील पारेख बंधूच्या दोन बंगल्यामध्ये ईडीचे अधिकारी चौकशी करत असल्याने शहरात सध्या तर्क वितर्क सुरु आहेत. सध्या तरी या चाैकशीबाबत काेणताही तपशिल अधिका-यांनी उघड केलेला नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply