Sangli Crime News : सांगलीत विचित्र अपघात, भरधाव वाहनानं फरपटत नेलं; मृतदेहाच्या चिंधड्या

Sangli Crime : सांगली येथे एक भयानक अपघात घडला. या अपघातात पीडित व्यक्तीला अज्ञात वाहनाने उडवले, नंतर फरपटत नेलं. ज्यात पीडित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तसेच चारचाकी वाहनानं फरपटत नेल्यामुळे मृतदेहाचे चिंधड्या झाल्या, तसेच मृतदेहाचे तुकडे रस्त्यावर पसरले होते. या प्रकरणी फरार आरोपीचा शोध पोलीस घेत असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सांगलीच्या कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्रीच्या सुमारास केरेवाडीजवळ, रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला. एका अज्ञात वाहनाने अनोळखी पुरूषाला धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहनानं मृतदेहाला तब्बल ५० मीटरपर्यंत फरपटत नेलं. ज्यामुळे मृतदेहाचे चिंधड्या झाल्या, आणि हे तुकडे रस्त्यावर विखुरले होते.

BJP Donation : भाजपला २२४४ कोटींची देणगी, काँग्रेस तिसऱ्या स्थानी, कोणत्या पक्षाला किती रक्कम मिळाली?

अपघात घडल्यानंतर आणि पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि रेस्क्यु फोर्स यांनी घटनास्थळी धाव मृत व्यक्तीचे तुकडे गोळा केले. अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. तसेच अज्ञात वाहन कोणते होते, आरोपी कोण आहे? हिट अॅण्ड रन आहे की आणखीन काही? या घटनेचा कसून तपास पोलीस करीत आहेत.

मुख्य म्हणजे अपघातात मृत व्यक्तीला फरपटत नेल्याकारणानं त्यांचा चेहरा खराब झाला. ज्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात अडचण येत आहे. स्पेशल रेस्क्यु फोर्स आपत्कालीन पथक यांच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे रस्त्यावरून एकत्रित करून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून, मृतदेह सध्या शीतगृहात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply