Crocodile : सांगलीत भर रस्त्यावर मगरीचे दर्शन; नागरिकांमध्ये पसरली दहशत, रेस्क्यू करत मगरीला पकडले

 

Sangli : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील धामवडे येथील वाहन धारकांना रस्त्यावर मगरीचे दर्शन झाले आहे. अर्थात बिबट्यानंतर आता रस्त्यांवर मगरींचा वावर पाहण्यास मिळत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मगरीला प्राणी मित्राने व ग्रामस्थांनी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले आहे. परंतु या भागात नदी नाही; तरीही मगर आली कुठून? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोंडाईवाडीचे ग्रामस्थ विश्वास पाटील, सुरेश पाटील, प्रथमेश पाटील हे शिराळाहून शिरसी मार्गे कोंडाजी वाडीकडे निघाले होते. यावेळी त्यांना शिरसी धामवडे या रस्त्यावर बाबासो मस्कर यांच्या घराजवळ मगर रस्त्यावरून जात असताना आढळून आली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना याबाबतची कल्पना दिली. तसेच वन विभागाला देखील याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर लागलीच टीम घटनास्थळी दाखल झाली होती.

मगरीला पकडून सोडले जंगलात

दरम्यान धामवडे व परिसरात गेली अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रात्री या रस्त्यावरती शुकशुकाट असतो. धामवडे हे गाव डोंगराच्या कपारीत वसलेले गाव आहे. या ठिकाणी नदी नाही, तरीही या भागात मगरीचे दर्शन झाल्याने नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान प्राणी मित्र आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीला पकडून जंगलात सोडण्यात आले आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *