Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकरी आक्रमक; नांदेडमध्ये आदेशाची होळी, सांगलीत महामार्गाची मोजणी रोखली

Nanded/ Sangli : शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आली आहे. तर या महामार्गाची २० हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. महामार्गाला विरोध करत शेतकरी रस्त्यावर उतरले असून नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाने काढलेल्या आदेशाची होळी केली. तर सांगलीत महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली आहे.

नागपूर ते गोवा असा हा महामार्ग होणार असून या महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. या महामार्गासाठी शेतकरी आपल्या जमिनी देण्यास तयार नाहीत. परंतु शासन शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे. तर शेतकरी मात्र आपल्या जमिनी या महामार्गास देण्यास तयार नाहीत. त्यामुळे या महामार्गावरून शेतकरी आणि शासन यांच्यात तीव्र संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासनाविरोधात बोंब मारो आंदोलन

नांदेडच्या मालेगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाने काढलेल्या आदेशाची होळी केली. शासन आदेशाची होळी करत शासनाविरोधात शेतकऱ्यांनी बोंब मारो आंदोलन केले. या आंदोलनात नांदेड, परभणी, हिंगोली येथील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून काही मोजक्याच लोकांच्या हितासाठी हा मार्ग शेतकऱ्यांवर लादण्यात येतोय. या महामार्गात हजारो कोटीचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ हा मार्ग होऊ देणार नसल्याचे भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे.

मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी धरले रोखून

सांगली : नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगलीच्या आटपाडीतील शेटफळे येथे शेतकऱ्यांनी रोखून धरले आहे. संतप्त शेतकऱ्यांकडून भूसंपादनाच्या मोजणी प्रक्रियेला जोरदार विरोध करण्यात आला असून कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही; अशी भूमिका घेतली आहे, त्यामुळे या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सकाळ पासून थांबून राहावे लागले आहे.

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *