Sangli : अचानक तोल गेला अन् नदीच्या पुलावरून पडला, तरूणाचा दुर्देवी मृत्यू

Sangli : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका 53 वर्षीय युवकाचा मोरणा नदीच्या पुलावर उभा असताना तोल जाऊन नदीत पडून मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव बाळकृष्ण विश्वनाथ थोरवाडे असे असून, ते पेठ नाका या गावचे रहिवासी होते. बाळकृष्ण हे पोटासाठी मजुरीचे काम करत होते आणि गेल्या चार महिन्यांपासून सागाव येथील वाडीभागाई फाटा परिसरातील एका दुकानात राहात होते.

सकाळच्या सुमारास बाळकृष्ण कामावर निघाले होते. त्याच दरम्यान मोरणा नदीच्या जुन्या पुलावर काही वेळ थांबले असता त्यांचा तोल गेला. पाय घसरल्यामुळे ते थेट 15 फूट खोल नदीत कोसळले. घटनास्थळी कोणीच उपस्थित नसल्यामुळे ही बाब सुरुवातीला लक्षात आली नाही. मात्र, काही वेळाने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या नजरेस नदीच्या पुलाजवळ उभी असलेली मोटरसायकल पडली. यामुळे नागरिकांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवले.

Jalna : मध्यरात्री काळाचा घाला, अपघातात माय-लेकीचा जागेवरच मृत्यू, २ जण जखमी

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रहार संघटनेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व पोलिस पाटील यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आणि थोड्याच वेळात बाळकृष्ण यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या घटनेमुळे गावात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस प्रशासनाने याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे. ही घटना नागरिकांसाठी सावधगिरीचा इशारा ठरत असून, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेची आवश्यकता अधोरेखित करते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply