Sangli : घराच्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड; १० किलो गांजाची २३ झाडे जप्त

Sangli : अंमली पदार्थ तसेच गांजा तस्करी व विक्रीस बंदी असताना देखील सर्रासपणे गांजा तस्करी केली जात असल्याचे वारंवार समोर आले आहे. अशाच प्रकारे सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथे गांजाची लागवड केल्याचे आढळून आले आहे. राहत्या घराच्या बाजूला गांजाची झाडे लागवड केलेल्या ठिकाणी तब्बल ९८ हजार किंमतीचा ९ किलो ८०८ ग्रॅमची गांजाची २३ झाडे जप्त करण्यात आले आहेत.

गांजाची तस्करी हि वारंवार उघड झाली आहे. तर शेतात पिकांच्या आड लागवड करत गांजा पिकविला जात असतो. असे प्रकार देखील समोर आले आहेत. तर सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथे तर घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तेथे छापा टाकत पोलिसांनी गांजा जप्तीची कारवाई केली आहे.

Beed News : "शेतासाठी अडवलेले पाणी का घेतले?" जाब विचारताच शेतावर बाप लेकाच्या डोक्यात दगड घातला; बीडमध्ये खळबळ

पोलिसांची घरी जाऊन झडती

सांगली पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये नागठाणे परिसरामध्ये राजू मदने याने त्याच्या राहत्या घराच्या बाजूला गांजाच्या झाडाची लागवड केली असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी नागेवाडी येथे जाऊन पाहणी केली असता घराच्या बाजूस लावलेला लहान मोठ्या आकाराचे उग्र वासाची २३ ओलसर गांजाची झाडे आढळून आली.

तरुणास घेतले ताब्यात

दरम्यान पोलिसांनी छापेमारी करत घराच्या बाजूला लागवड केलेली गांजाची झाडे जप्त केले आहेत. तर लागवड करणाऱ्या राजू श्रीरंग मदने यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. तसेच अमली पदार्थ, गांजा विक्री साठा लागवड याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावे असे आवाहन ही पोलिसांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply