Sangli Police : शाळकरी मुलाने खुलेआम व्यसन; इ सिगारेट विकणाऱ्या दुकान चालकाला अटक

Sangli : सांगलीत शाळकरी मुलाने इ सिगरेटच्या द्वारे उद्यानात खुलेआम व्यसन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या अनुषंगाने सांगली पोलिसांनी छापा सत्र सुरु केले आहे. यात सांगलीतील नोवेल्टी दुकानात निर्बंध असताना सिगारेट विकणारा दुकान चालक लखन मंगलानी याला अटक करून याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून इ सिगरेटचे आठ पॅकेट्स जप्त करण्यात आले आहे. दुकान चालकाने सिगरेट ऑनलाइन खरेदी केले आहेत.

सांगलीतील युवकांना नशाबाजारचा विळखा बसत चालला आहे. दोन दिवसांपूर्वीच एका मैदानावर काहीजण ई- सिगरेट ओढत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यासंदर्भात महापालिका प्रशासाने देखील उद्यानाबाहेर कर्मचाऱ्यांमार्फत लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली होती. दरम्यान मारुती रस्त्यावरील ऊॅ बेल्टस ॲड नॉव्हेल्टी नावाच्या दुकानात ई - सिगरेटची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

PMPML : पुणेकरांसाठी खुशखबर! पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच १००० नव्या बसचा होणार समावेश

ऑनलाईन मागविला माल पोलिसांनी त्यानुसार बुधवारी रात्री दुकानात छापा टाकून तपासणी केली. त्यावेळी काऊंटरनजीक असलेल्या एका बॉक्समध्ये ८ ई - सिगरेटची पाकिटे मिळून आली. त्या संदर्भात विचारणा केली असता त्याने ई - सिगरेट एका वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन मागविल्या असल्याचे सांगितले. सर्व माल पोलिसांनी जप्त केला. तसेच संशयित दुकान चालक लखन मंगलानी याच्यावर प्रोव्हिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगरेट ॲक्ट २०१९ अन्वये सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सांगली, मिरजमधील सर्व पान शॉपची होणार तपासणी सांगली शहरातील मारुती चौक येथे असणाऱ्या एका दुकान चालकाकडून पोलिसांनी १६ हजार रुपये किंमतीच्या ८ ई- सिगरेट पॅकेटस जप्त केले आहेत. सदरचे ई सिगारेट हे बेकायदेशीर विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रात्रीच्या सुमारास ही कारवाई केली. याप्रकरणी लखन चंद्रकांत मंगलानी या विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर सांगली आणि मिरज शहरातील पान शॉपची पोलीस पथकांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply