Sangli Crime : दुचाकी विक्रीच्या तयारीत असताना चोरटा ताब्यात; चोरीच्या २१ दुचाकी जप्त

Sangli : मागील काही दिवसांपासून सांगली व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. या प्रकरणी पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यानंतर पोलिसांकडून दुचाकी चोरट्याचा शोध सुरु असताना दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत चोरट्यास सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून २१ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

सांगलीच्या भिलवडी परिसरात गेल्या सहा महिन्यापासून दुचाकी चोरीच्या सत्र सुरू होते. अनेक मोटरसायकल येथून चोरीस गेलेल्या होत्या. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरु होता. यातच पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने कदमवाडी ते सांगलवाडी रस्त्यावरील सिद्धिविनायक चौकात विना नंबरची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या एका संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पलूस तालुक्यातील बाजारातून चोरल्याची कबुली दिली.

चोरीच्या २१ दुचाकी जप्त

सुदीप चौगुले असे या दुचाकी चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून २१ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सांगलीवाडी नजीक चोरीतले दुचाकी विक्रीसाठी आले असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केलं. त्यानंतर तपासात त्याच्याकडून सांगली, माळवाडी, जत, कडेगाव, पलूस, वांगी आणि भिलवडी येथून दुचाकी चोरल्याचे उघडकीस आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे.

सांगली पोलिसांचा मद्यापी, हुल्लडबाजांना दणका सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करताना सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणारे आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यावर सांगली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्ह्यात ४० ठिकाणी नाकेबंदी करून पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पहाटेपर्यंत सुमारे ५०० पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर तैनात होते. दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल आऊट मोहीम राबवण्यात आली. यामध्ये हद्दपार तडीपार आणि सराईत गुन्हेगागारांचा शोध घेण्यात आला

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply