Sangamner Crime : संगमनेरमध्ये खळबळ! उपचारासाठी दाखल मुलीवर अत्याचार; डॉक्टर ताब्यात,नातेवाईक व रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये झटापट

Sangamner : रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर डॉक्टरांकडूनच अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये घडली आहे. यामुळे वैद्यकीय वर्तुळासह संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली असून फरार झालेल्या डॉक्टरला पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमधील महाविद्यालयीन शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलीला श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. यामुळे तिला संगमनेर शहरातील डॉ. कर्पे हॉस्पिटलमध्ये ४ एप्रिलला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी पहाटे डॉ. अमोल कर्पे याने मुलीच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर तीला बाहेर बोलावून टेरेसवर नेले आणि तिथे तिच्याशी गैरवर्तन केले. मुलीने विरोध केला असता डॉ. कर्पे याने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला.

 

मुलीला दिली धमकी

इतकेच नाही तर याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुला जिवंत ठेवणार नाही, असा दमही डॉक्टरने मुलीला भरला. दरम्यान घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घडला प्रकार कुटुंबियांना सांगितला. यानंतर पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान मुलीवर अत्याचार करणारा डॉ. अमोल कर्पे हा फरार झाल्याने पोलिस शोध घेत असताना तो नाशिक येथे पळून गेला होता. संगमनेर पोलिसांनी तपास करत नाशिक पोलिसांच्या मदतीने त्याला नाशिक येथून ताब्यात घेतले.

संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ

दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त जमावाने रुग्णालया बाहेर गर्दी केली असता रुग्णालय कर्मचारी आणि जमाव यांच्यात तणाव निर्माण होऊन झटापट झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती समजल्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी देखील पोलिस ठाण्यात जात आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply