सांगली : कृष्णा नदीत माशांच्या मृत्यूप्रकरणी वसंतदादा कारखान्यावर कारवाई; पुढील आदेशापर्यंत कारखाना बंद अन्...

सांगली : दोन दिवसांपूर्वी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये लाखो माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पाणी दूषित झाल्याने माशांचा खच पडला होता. माध्यमांनी हा मुद्दा उचलल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्यावर कारवाई केली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वसंतदादा साखर कारखान्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आलेला आहे. हा कारखाना पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मंडळाने दिलेले आहेत. तर कारखान्याची वीज जोडणी आणि नळ जोडणी तोडण्याचेही आदेश दिले आहेत.

कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मळीमिश्रित पाणी सोडल्याने परवा लाखो माशांचा मृत्यू झाला होता. सर्वच माध्यमांनी याबाबत आवाज उठवला. स्थानिकांनी संताप व्यक्त केला होता. याप्रकरणी आता महाराष्ट्र प्रदूषण नियमंत्रण मंडळाने मोठी कारवाई करत कारखाना बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply