Sand Mafia News : वाळू माफियांचा हैदोस; पंढरपुरात महसूल पथकावर दगडफेक, तर हिंगोलीत तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न

Sand Mafia News : वाळू माफियांच्या दादागिरीच्या दोन घटना पंढरपूर आणि हिंगोलीमधून समोर आल्या आहेत. बेकादेशीर वाळू उपसाला विरोध केल्याने वाळू माफिया तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला आहे.

हिंगोलीच्या कळमनुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कोंढूर परिसरात वाळू तस्करीची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. वाळू तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल प्रशासनाच्या तलाठी व कोतवालाला वाळू माफियाने ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तलाठी जगदीश कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून दोन वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident News : पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! भरतीच्या सरावासाठी जाताना भीषण अपघात; १ जागीच ठार, ३ जखमी

पंढरपुरातही अवैध वाळू उपसा विरोधात कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी दगड आणि काठ्यांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यामध्ये पंढरपूरच्या तहसीलदारांची गाडी फोडली आहे. आज पहाटेच्या सुमारास पंढरपूर जवळच्या गुरसाळे गावात ही घटना घडली आहे.

गुरसाळे येथील भीमानदी पात्रातून जेसीबीच्या साह्याने अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल विभागाच्या पथकाला मिळाली होती. हे पथक आज पहाटे गुरसाळे येथे कारवाईसाठी गेले असता, अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू 15 ते 20 माफीयांनी कारवाईसाठी आलेल्या महसूल पथकाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. यामध्ये वाळूमाफियांनी पंढरपूरच्या तहसीलदारांची गाडी फोडली. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply