Samruddhi Mahamarg Accident : कुत्र्याला वाचवण्याच्या नादात झाला भयंकर अपघात; 2 जण जखमी

Jalna Accident News : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये. विकासाचा मार्ग म्हणून बांधण्यात आलेल्या या महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. एकीकडे परिवहन विभागाने महामार्गावरील अपघात कमी करण्याची गांधीगिरी सुरू केली असताना दुसरीकडे समृद्धी महामार्गावर पुन्हा एका कारचा भीषण अपघात झाला आहे. 

समृद्धी महामार्गावर कुत्रा मध्ये आल्याने एका कारचा अपघात झाल्याची झाला आहे. काल मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात दोन जण जखमी गंभीर जखमी झाले असून.पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जालन्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे.

हे दोन्ही प्रवाशी गोंदिया कडून संभाजीनगरच्या दिशेने मध्यरात्री एक वाजल्याच्या सुमारास जातं असताना जालन्यातील समृद्धी महामार्गांवर हा अपघात झाला आहे. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या महामार्गावर कुत्रा आल्याने हा अपघात झाल्याने हा महामार्ग सुरक्षाच्या दृष्ठिनी असुरक्षित असल्याची भावना आता प्रवशी वर्गातून व्यक्त केल्या जातं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply