Samruddhi Mahamarg Accident : जालन्यात समृध्दी महामार्गवर वाहनाचा टायर फुटून भीषण अपघात; ४ जण जखमी

Samruddhi Mahamarg Accident :  गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. दररोज समृद्धी महामार्गावर किरकोळ आणि भीषण अपघात होत आहे. एकीकडे महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाने गांधीगिरी सुरू केली असताना, दुसरीकडे समृद्धी महामार्गावर टायर फुटून आणखी एक भीषण अपघात झाला आहे.

समृध्दी महामार्गावर टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. नाशिकहून यवतमाळच्या दिशेने जाणाऱ्या गाडीचा समोरील टायर अचानक फुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने ही गाडी समृध्दी महामार्गाच्या रस्त्याच्या मधोमध जाऊन थाबली. टायर फुटला तेव्हा गाडीमध्ये चार जण प्रवास करीत होते मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात चौघेही किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी क्रेनच्या मदतीने गाडी बाजूला करत समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू केली. या अपघातात रितेश धात्रक, प्रिय ठाकूर, योगेश ठाकूर, श्लोक परदेशी हे प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply