Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच, भरधाव कारचा टायर फुटून ट्रकला धडक; चौघे जखमी

Washim News : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. वाशिमजवळ या महामार्गावर पुन्हा अपघाताची घटना घडली आहे. कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 4 जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या मालेगाव तालुक्यात रेगाव परिसरात ही घटना घडली. समृद्धी महामार्गावर भरधाव कारचा टायर अचानक फुटला. या कारने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारमधील चौघे जण जखमी झालेत. जखमींवर नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ही कार नागपूरवरुन मुंबईच्या दिशेने निघाली होती. याच दरम्यान ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी देखील समुद्री महामार्गावर वाशिमच्या कारंजा तालुक्यात अपघात झाला होता. कार चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला होता. ही कार तुळजापूरवरुन नागपूरकडे जात होती. या अपघातामध्ये सात जण गंभीर जखमी झाले होते.

समृद्धी महामार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. दोन ट्रकने एकमेकांना धडक दिली. अपघातानंतर दोन्ही ट्रकला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की यात एक ट्रक जळून खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रकचालक आणि सहकाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply