
Bulldhana : मागील दोन वर्षांत लहान मोठ्या अपघातांनी गाजलेल्या समृद्धी द्रुतगती महामार्ग वाढत्या गुन्हेगारीमुळे देखील वादग्रस्त ठरत आहे. या समृद्धी महामार्गावरील उभ्या असलेल्या वाहनांमधील डिझेल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान लोणार तालुक्यातील बीबी पोलिसांच्या कारवाईत ही बाब उघड झाली आहे. बीबी पोलीस ठाण्याच्या पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील चार जणांना ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी हा इंधन चोर टोळीने चोरलेले डिझेल खरेदी करणारा निघाला असताना हि कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर- मुंबई अशा समृद्धी महामार्गावर वाहनांची प्रचंड रहदारी आहे. अनेकदा मोठ्या ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जात असतात. या वाहनांमधून डिझेल चोरी केली जात होती. दरम्यान चंद्रपूरच्या कल्याणी टॉवर येथील किरण कुमार लिंगया कनुकुंटल (वय ३८) हे १३ नोव्हेंबर २०२४ रोजी ट्रकने समृद्धी मार्गावरून मुंबई येथून नागपूरकडे जात होते. लांबचा प्रवास असल्याने त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धीवरील दुसरबीड टोल नाक्याजवळ आराम करण्यासाठी आपले मालवाहू वाहन थांबविले.
|
|
गाढ झोपेत असताना चोरले डिझेल
गाढ झोपेत असताना त्यांच्या वाहनातील पाऊण लाख रुपये किंमतीचे डिझेल अज्ञात चोरांनी लंपास केल्याचे आढळून आले. तसेच वाहनाची समोरील काच फोडल्याचे दिसून आले. प्रकरणी किरण कुमार लिंगया कनुकुंटल यांनी बीबी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली. यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना घटनेचा तपास करण्याचे आव्हान ठाणेदार संदीप पाटील, त्यांचे सहकारी परमेश्वर शिंदे, अरुण सानप, रवींद्र बोरे यांनी यशस्वी रित्या पेलले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण च्या आधारे त्यांनी आरोपींचा छडा लावला.
यानंतर २० डिसेंबरला चिखली पोलीस हद्दीतील गजानन नगर चौफुली भागात पोलिसांनी छापा घातला. यावेळी लक्ष्मण उर्फ संतोष गुलाब लहाने (वय २७, रा. खंडाला मकरध्वज, ता. चिखली), निलेश संतोष भारूडकर (वय ३३, रा. सातगाव भुसारी, ता. चिखली) आणि देविदास प्रकाश दसरे (वय २८, रा. साखर खेरडा, ता. सिंदखेडराजा) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्या जवळील दोन कार जप्त करण्यात आली. तसेच ३५ लिटर क्षमतेच्या ४ प्लास्टिक कॅन देखील जप्त केल्या.
डिझेल विक्रीला नेत असताना पकडले
तिघांची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी त्यांच्या चौथ्या सहकाऱ्याची माहिती दिली. २१ डिसेंबरला रात्री उशिरा देऊळगाव घुबे येथील रहिवासी आरोपी सचिन परशराम घुबे (वय २१) याला देखील अटक करण्यात आली. त्याने डिझेल खरेदी केल्याची कबुली दिली. या चौघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान २१ डिसेंबर रोजी रात्री उशिरा ही कारवाई पूर्ण करून बीबी कडे जात असताना पोलीसांना एक संशयास्पद कार आढळून आले. त्याला थांबविले असता त्यातील व्यक्ती अंधाराचा फायदा घेत पसार झाले. त्या वाहनात १८ लिटरच्या कॅन सापडल्या.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


