Samruddhi Highway News : समृद्धी महामार्गात १,००० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा?; काँग्रेसच्या आरोपाने खळबळ

Samruddhi Highway News: मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनामध्ये १००० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक आरोप आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. याच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्याची मागणीही केली आहे.

समृद्धी महामार्गाच्या जालना नांदेडमधल्या भागासाठी जमीन संपादनामध्ये १ हजार कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घोटाळ्यामध्ये जालना आणि परभणी जिल्ह्यातल्या काही दलालांचाही सहभाग आहे. तसंच माजी मंत्रीही यामध्ये सामील असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे.

या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठित करावी अशी मागणीही गोरंट्याल यांनी केली आहे.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी ही मागणी केली आहे. या महामार्गासाठी संपादित कऱण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला देताना ज्या प्रमाणात खर्च होतोय, त्यापेक्षा कमी खर्च महामार्गाच्या कामासाठी लागणार आहे.

समृद्धी महामार्गाचा प्लॅन तीन वर्षांपूर्वी लीक झाल्याचा आरोपही गोरंट्याल यांनी केला आहे. काही माजी मंत्री आणि दलालांनी महामार्गात जाणाऱ्या जमिनी आधीच कमी किमतीने खरेदी केल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे. या जमिनी फळबागा म्हणून दाखवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply