Sambhajinagar News: ‘जेएन.१’ व्हेरिएंटची छत्रपती संभाजीनगरमध्ये एन्ट्री? कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ

Sambhajinagar News: देशासह राज्यात कोरोनाच्या नव्या ‘जेएन.१’ व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे. राज्यभरात कोरोना तपासणी चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये १० वर्षीय मुलीसह एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.  

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले दोन्ही रुग्णसिडको एन-७ परिसरात असल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ६६ जणांचे अहवाल घेतले होते. त्यापैकी २१ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह तर १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत.

J&K Terrorist Attack News : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा हल्ला, तीन जवान शहीद

दरम्यान, कोरोनाबाधित आढळलेल्या मुलीसह महिलेचा अहवाल जिनोम सीक्वेंसिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हे रुग्ण नव्या व्हेरीएंटचे आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. मात्र, बऱ्याच दिवसानंतर शहरात कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.  



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply