Sambhajinagar Crime : संभाजीनगरात सशस्त्र दरोडा; गळ्याला चाकू लावून दागिने लुटले

Sambhajinagar Crime : चोरट्यांचा भरवस्तीत धुमाकूळ सुरु असल्याने पाहण्यास मिळत आहे. यातच छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरामध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या सुमारास सातारा परिसरात कुटुंबातील सदस्याला गळ्याला चाकू लावून घरातील दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे. घटनेत चोरटे घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज चोरी, दरोड्याच्या घटना घडत आहेत. मागील काही दिवसात वाळूज, पंढरपूर भागात घडलेल्या घटना ताज्या असताना पोलिसांना थेट आव्हान देत दरोडेखोरांनी शहरातील सातारा परिसरात धुमाकूळ घातला. घरात घुसून कुटुंबियांच्या गळ्यावर चाकू ठेवून दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

भर पावसात धुमाकूळ

दरम्यान मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस सुरू असताना ६ दरोडेखोरांनी मंकी कॅप घालून आले. हातात कोयता, चाकू, तलवार, टॉमीसारखे, फावड्याचा दांडा, लोखंडी कटोनी शस्त्रे घेऊन धुमाकूळ घातला. या चोरट्यांनी नीलेश बागूल यांच्या बंगल्याचे चॅनल गेट दरोडेखोरांनी तोडले. यानंतर घरात प्रवेश करत बाप-लेकाच्या गळ्याला चाकू लावून घरातील महिलांच्या अंगावरील दागिने लुटन पसार झाले.

चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

दरम्यान भर पावसात या दरोडेखोरांनी चोरी केली. मंकी कॅप घालून आलेले सहा सशस्त्र दरोडेखोर घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करत चोरट्यांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. मात्र घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply