Sambhajinagar Crime : मेंढपाळ कुटुंबावर सशस्त्र दरोडा; मारहाण करत दागिन्यांसह रोख रक्कम लुटली, ८ जण जखमी

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या लोहगाव शिवारात धक्कादायक घटना समोर आली आहे. लोहगाव शिवारात असलेल्या चार मेंढपाळ कुटुंबांवर रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. यात ८ जण जखमी झाले असून २ महिला व ६ पुरुषांचा यात समावेश आहे. दरोडेखोरांनी सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कमही लुटली.

मेंढपाळ कुटुंब फिरस्ती करत असल्याने वेगवेगळ्या शेत शिवारात ते आपला मुक्काम करत असतात. रात्रीच्या अंधारात हे कुटुंब मेंढ्याना घेऊन शेत शिवारात राहत असतात. त्यानुसार बारामती तालुक्यातील मुढाळ या गावातील चार मेंढपाळ कुटुंब हा संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यामधील लोहगाव शिवारात मेंढ्यांच्या कळपासह राहुटी करून थांबले होते. या चार कुटुंबावर हल्ला करण्यात आला आहे.

Santosh Deshmukh : संतोष देशमुखांचा हादरवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट, हालहाल करून जीव घेतला, वाचून डोळ्यातून अश्रू येतील

मारहाण करत दागिने घेऊन पसार

काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी मेंढपाळ थांबलेल्या शेतीच्या एका बाजूचे तारेचे कुंपण तोडून आतमध्ये आले. याठिकाणी त्यांनी राहुटीत झोपलेल्या ४ कुटुंबांतील ६ पुरुष व २ महिलांना लाकडी दांडे व कुऱ्हाडीने जोरदार मारहाण सुरू केली. त्यानंतर महिला व लहान मुलांच्या अंगावरील ५ ते ७ तोळे सोने, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम घेऊन पसार झाले आहेत. अचानक घडलेल्या या हल्ल्याने मेंढपाळ कुटुंब घाबरले होते.

जखमी रुग्णालयात दाखल

दरम्यान घडल्या प्रकारानंतर जखमी मेंढपाळांनी जवळच्या गावात जाऊन लोकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर जखमी गुलाब टेगळे, अप्पासाहेब टेगळे, सोनबा हाके, सिताराम टेगळे, लक्ष्मीबाई टेगळे, लिंबाबाई टेगळे, हिरामण टेगळे, कांतीलाल टेगळे यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील हिरामण टेगळे, कांतीलाल टेगळे हे गंभीर जखमी झाले आहेत. सदर प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply