सलीम आणि सलमान खान पितापुत्राला धमकी; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. वांद्रे पोलिसांनी  अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. हे धमकीचे पत्र सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला मिळाले आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

सलमान खान ज्या ठिकाणी वॉकला जातो आणि ज्याठिकाणी ब्रेक घेतो त्या ठिकाणी हे पत्र मिळाले आहे. यामुळे आता बॉलिवूड विश्वास खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिनेता सलमान खान याला मिळालेले धमकीचे पत्र त्याचे वडील सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला मिळाले आहे. सलमान ज्या ठिकाणी वॉकला जातो, त्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतो, त्या बाकड्यावर मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

या पत्रात सलमान धमकी दिली आहे. या पत्रात सलमान आणि सलीम खान या दोघांना गंभीर धमकी दिली आहे. 'मूसा वाला जौसा कर दूंगा' अशा आशयाचे हे पत्र आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू करुन, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. सलमानला आलेल्या धमकीच्या पत्रानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *