Sadabhau Khot : पुणे बंगळूर महामार्गावर सदाभाऊंचा ठिय्या, शेतकरी रस्त्यावर झाेपले; वाहतूक ठप्प

Sadabhau Khot : शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाने साेडवावेत या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून काढण्यात आलेल्या रयत क्रांती संघटना सरपंच परिषदेच्या "वारी शेतकऱ्यांची" ही पदयात्रा आज (गुरुवार) साता-यात पाेहचली. दरम्यान जाेपर्यंत सरकारमधील मंत्री प्रश्नांकडे दखल घेत नाहीत ताेपर्यंत आंदाेलन सुरु राहणार असा इशारा देत शेतक-यांसह सदाभाऊ खाेत यांनी पुणे बंगळूर महामार्गावर ठिय्या मांडला. यामुळे महामार्गावरील सातारा पुणे मार्गाची वाहतुक खाेळंबली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने 22 मे पासून कराड ते सातारा यादरम्यान वारी शेतकऱ्यांची ही पदयात्रा काढण्यात येत आहे. आमच्या मागण्यांवर आणि प्रश्नांवर राज्य शासनाने निर्णय न घेतल्यास ही वारी मुंबई पर्यंत काढणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला हाेता.

आज खाेत यांची पदयात्रा साता-यानजीक आल्यानंतर शेतक-यांनी जाेरदार घाेषणाबाजी केली. यावेळी खाेत यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळे वाहतुक खाेळंबली. खाेत म्हणाले महाराष्ट्रामध्ये ऊसाला चार हजार रुपये भाव मिळतो तो गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात लागू करावा, दोन कारखान्यांमधील 25 किलोमीटरचे हवाई अंतर कमी करावे, मुठभर लोकांच्या हितासाठी अस्तित्वात आलेला तुकडे बंदी कायदा रद्द करावा आदी मागण्यांसाठी सरकारला वेळ नाही. राज्य शासनाने अडेलतट्टूपणा जर केला तर साताऱ्यातून 500 वाहनांमधून ही यात्रा थेट मुंबईतील मंत्रालयावर धडकेल असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply