Sadabhau Khot News : सदाभाऊ खोत यांच्या मागणीनं लोकसभा निवडणुकीआधी शिंदे गटाचं टेन्शन वाढलं

Sadabhau Khot : राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहु लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वत्र मोर्चेबांधणी सुरू झाली असून जागा वाटपाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. अशातच आता महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभेची जागा लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणालेत सदाभाऊ खोत?

"हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. त्यामुळे महायुतीमधून हातकणंगले लोकसभेची जागा मी मागितली आहे. असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. तसेच कुणाच्या विरोधात लढाईसाठी हातकणंगलेची जागा मागितली नाही तर शेतकऱ्यांसाठी मागितली आहे," असे स्पष्टिकरण त्यांनी दिले आहे.

Yavatmal Accident : पोहरादेवीला निघालेल्या वाहनास बेलगव्हान घाटात अपघात; पाच ठार, 11 जखमी

धैर्यशील मानेंना टोला..

"मागच्या वेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मशागत मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र हा गडी चांगला पेहराव करून आला आणि आम्ही केलेल्या मशागतीचा फळ घेऊन गेला. त्यावेळी ⁠यावेळी त्यांनी त्याची परतफेड करावी आमच्यासाठी त्यांनी यावेळी कष्ट घ्यावेत," असेही सदाभाऊ खोत म्हणालेत.

केसरकरांवर टीका...

यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी घेतलेल्या निर्णयाला जोरगार विरोध दर्शवला. "शेती करताना बाप आत्महत्या करत आहे, आता मुलं शाळेत शिकत असतानाच आत्महत्या करतील याच उद्देशाने दीपक केसरकर यांनी शालेय शिक्षणात शेती हा विषय घेण्याचा घेण्याचा विचार केला असावा," अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply