Sabarmati Express derails: साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे कानपूर स्थानकाजवळ रूळावरून घसरले; ट्रॅकवरील वस्तूमुळे अपघात

Sabarmati Express derails : वाराणसी-अहमदाबाद दरम्यान प्रवास करणाऱ्या साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे उत्तर प्रदेशमधील कानपूर आणि भीमसेन स्थानकादरम्यान रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास रूळावरून घसरले. या अपघातात कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना दिली. लोको पायलटने दिलेल्या माहितीनुसार रूळावरील वस्तूला इंजिनची धडक बसल्यामुळे सदर अपघात झाला. या अपघातानंतर रेल्वेने प्रवाशांना बसची सुविधा उपलब्ध करून देत त्यांना कानपूर येथे आणले आहे. तिथून त्यांची अहमदाबादला जाण्याची व्यवस्था केली जात आहे.

कानपूरचे उपजिल्हाधिकारी राकेश वर्मा यांनी एएनआयशी बोलताना म्हटले की, २२ डबे रूळावरून खाली घसरल्याचे दिसत आहे. या घटनेत अद्याप कुणीही जखमी झाल्याचे समोर आलेले नाही. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामुळे या मार्गावरील सात ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर तीन ट्रेन इतर मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत.

Pune : मित्र डोळ्यादेखत खाणीत बुडाला, मुलांनी घरी सांगितलंच नाही; पुण्यातील हृदयद्रावक घटना

 

अपघात कुठे आणि कसा झाला?

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद एक्सप्रेस रात्री कानपूर स्थानकावरून निघाल्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे २.३० वाजता भीमसेन स्थानकाच्या अलीकडे रूळावरून खाली घसरली. याच ट्रकवरून रात्री १.२० वाजण्याच्या सुमारास पाटना – इंदूर ट्रेन विनाअडथळा व्यवस्थित गेली होती.

रूळावरील खडक आणि इंजिन यांच्यात धडक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे इंजिनच्या पुढच्या भागाचे थोडे नुकसान झाले आहे. लोको पायलटनेही इंजिनच्या पुढच्या बाजूला असलेल्या कॅटल गार्डचे अपघातामुळे नुकसान झाले असल्याचे सांगितले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही याला दुजोरा दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply