Saamana Editorial : १० वर्षांत ५६ इंच जमिनही भारतात आणू शकले नाही; 'पाकव्याप्त काश्मीर'वरून ठाकरे गटाचा भाजपवर हल्लाबोल

Saamana Editorial : ठाकरे गटाचे मुखपत्र सामनामधून अमित शाहंवर निशाणा साधण्यात आला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी पाकव्याप्त पाकिस्तान घेण्याचं वक्तव्य ते करत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंनी आता लोकसभा निवडणुकीत पुन्हा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. त्यावरून अमित शाहंवर सामना अग्रलेखातुन टीका करण्यात आळी आहे. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा घेऊ असं वक्तव्य अमित शाहंनी केलं आहे. असं वक्तव्य फक्त टाळ्या वाजवणं आणि मतं मागण्यासाठी ठिक असल्याची टीका सामनामधुन करण्यात आली आहे.

काश्मीर मिळविण्यासाठी ५६ इंचाची छाती लागते. ती छाती कॉंग्रेसची नाही, असं भाजप सरकार २०१४ पासुन म्हणत आहेत. मागील दहा वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. तरीही पाकव्याप्त काश्मीर ते भारतात आणू शकले नाही. मोदींना कुणी अडवलं होतं, याचा खुलासा अमित शाहंनी करावा अशी मागणी सामनामधून करण्यात आली  आहे.

Ghatkopar Hoarding Case : घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून ४ जणांचा मृत्यू, ६९ जणांना केलं रेस्क्यू; कंपनीवर गुन्हा, उच्चस्तरीय चौकशी होणार

शेजारील राष्ट्रांचा आदर करायला हवा. त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे, असं वक्तव्य कॉंग्रेसने केलं आहे. विरोधकांना प्रचाराचा मुद्दा मिळाला. पाकिस्तानला घाबरून राहा, असं कॉंग्रेस सांगत असल्याचं त्यांनी सांगायला सुरूवात केली. देशाचे एक सुपुत्र मागील आठ वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरूंगात आहेत. भारतासाठी हेरगिरीचा ठपका ठेवत त्यांचं अफगानिस्तानमधून अपहरण केलं. पाकिस्तानच्या तुरूंगामध्ये टाकून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यांना सोडविण्यासाठी विरोधक काय करू शकले, असा सवाल विचारला आहे.

अमित शाह पाकिस्तानच्या अणुबॉम्बला घाबरत नाहीत. त्यांनी पुलवामा हल्ल्यात वापरलेले ४०० किलो आरडीएक्स कुठून आलं ते सागांवं, असं सामनामध्ये म्हटलंय. निवडणुक जिंकण्यासाठी पाकव्याप्त पाकिस्तान परत घेण्याचं वक्तव्य शाह करत आहेत. परंतु त्यांनी मणिपूरवर ताबा मिळवणं गरजेचं आहे. मणिपूरमध्ये आज देखील हिंसाचार आणि अत्याचार सुरू आहेत. तेथील जनता अशांत आहे. या उद्रेकातुन भारतात सत्ता परिवर्तन होण्याची चिन्हं दिसत असल्याचं सामनामध्ये दिसत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply