Russia -Ukraine War : रशियात अडकले २० भारतीय; परदेशात नोकरी देतो म्हणून थेट उतरवलं रशिया-युक्रेनेच्या युद्धात

Russia -Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात भारतीय अडकल्याची कबुली भारत सरकारने दिलीय. या २० भारतीयांना चांगल्या नोकऱ्या देण्याचं आमिष देत तेथे नेण्यात आल्याचं सरकारने सांगितलंय. हे लोक अजूनही तिथेच अडकले असून त्यांना परत आणले जाणार असल्याचं दावा सरकारकडून केला जात आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असून रशियन अधिकाऱ्यांशीही चर्चा सुरू आहे. रशियात अडकलेल्या या लोकांनीही आमच्याशी संपर्क साधल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले वृत्त लाइव्ह हिंदुस्तान या हिंदी वृत्तसंस्थेने दिले आहे.

रशियात अडकलेल्या २० लोकांना चांगल्या पगाराचे आणि सोयीसुविधांचे आमिष दाखवून रशियात नेण्यात आले. तेथे काही काळ प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना थेट युद्धाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले. ही बातमी जेव्हा समोर आली तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांना वाचवून घरी आणण्याचे आवाहन भारत सरकारकडे केले आहे. भारतीय रशियन सैन्यात सामील झाले आहेत.

Amravati Politcs : नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार?, कमळ चिन्हावर निवडणूक लढणार?; सूत्रांची माहिती

या लोकांना तेथून हाकलून देण्यात आले आहे अस परराष्ट्र मंत्रालयाने २६ फेब्रुवारी रोजी सांगितलं होतं. दरम्यान या लोकांना भारतात परत आणण्याची तयारी सुरू आहे. तसेच भारतीयांना जबरदस्तीने तिथे ठेवू नये आणि त्यांना मायदेशी पाठवले जावे, असा मुद्दाही रशियन लष्कर आणि सरकारसमोर मांडण्यात आल्याचं भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply