Mohan Bhagwat : 'काही लोकांना देशाची प्रगती पाहायची नाही', सरसंघचालक मोहन भागवतांचा विरोधकांवर निशाणा

RSS Vijayadashmi Program : विजयादशमीनिमित्त नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयात स्थापना दिवस आणि शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे नागपूरच्या रेशीमबागमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला यावर्षी गायक शंकर महादेवन  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते.

या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वांना संबोधीत केले. त्यांनी राम मंदिर, जी-२० परिषदेसह अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर व्यक्तव्य केले. तसंच, 'काही लोकांना देशाची प्रगती पाहायची नाही, भारतामध्ये राहून ते भारताचाच विरोध करत आहेत.', अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

Dussehra Melava 2023 : दसरा मेळाव्यासाठी ७५ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १२५०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात, वाहतुकीतही बदल

सरसंघचालक मोहन भागवत यांनी जी-20 शिखर परिषदेचे उदाहरण देत सांगितले की, 'दरवर्षी अनेक गोष्टी घडतात. ज्यामुळे आपल्याला अभिमान वाटतो. भारत सर्व क्षेत्रांमध्ये वेगाने पुढे जात आहे. डिजीटल क्षेत्रामध्येही भारताचा वेगाने विकास होत आहे. देशात जी-20 परिषदेचे आयोजन यशस्वीपणे पार पडलं.' तसंच, 'आमच्या नेतृत्वामुळे आज जगात आपले वेगळे स्थान आहे. भारताच्या अनोख्या विचारसरणीमुळे आणि दूरदृष्टीमुळे 'वसुधैव कुटुंबकम' हे आमचे मार्गदर्शक तत्त्व आता संपूर्ण जगाच्या तत्त्वज्ञानात समाविष्ट झाले आहे.' असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यांनी पुढे सांगितले की, 'देशाची शान वाढवणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. जी- 20 परिषद हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. जगाने आमचे राजकीय कौशल्य पाहिले आहे. आपल्या नेतृत्वामुळे आपण जगातील मोठ्या देशांपैकी एक झालो आहोत. आशियायी क्रिडा स्पर्धेत भारताला अनेक पदके मिळाली आहेत. आपल्या खेळाडूंनी आशियाई क्रिडा स्पर्धेत प्रथमच 100 - 107 हून अधिक पदके जिंकून आपल्या सर्वांना प्रोत्साहन दिले. आम्ही त्या सर्वांचे आभार मानतो. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत देखील सुधारणा होत आहे. आपण दहाव्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर आलो आहोत.'

राम मंदिराच्या उद्घाटनाबद्दल मोहन भागवत यांनी सांगितले की, 'रामाचा फोटो आपल्या संविधानाच्या पहिल्या पानावर आहे. त्याचे भव्य मंदिर अयोध्येत बांधले जात आहे. राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. आपण सगळे जाऊ शकणार नाही, पण आजूबाजूच्या मंदिरात जाऊ शकतो. आपण देशात धार्मिकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.' असं मत त्यांनी व्यक्त केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply