RSSचं हॉस्पिटल फक्त हिंदुंसाठीच आहे का? टाटांच्या प्रश्नावर गडकरींनी दिलं होतं उत्तर

.

पुण्यात सिंहगड रोड परिसरातील एका धर्मादायी रुग्णालयाचं उद्घाटनं गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं, यावेळी त्यांनी एक जुना किस्सा कथन केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं (RSS) हॉस्पिटल फक्त हिंदुंसाठीच आहे का? असा प्रश्न रतन टाटांनी आपल्याला केला होता. त्यावर त्यांना गडकरींनी उत्तरही दिलं होतं.

आजच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, जेव्हा मी महाराष्ट्र शिवसेना-भाजपच्या तत्कालीन सरकारमध्ये मंत्री होतो तेव्हा एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यानं मला विनंती केली की, आपल्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी रतन टाटांना घेऊन याल का? यावर मी रतन टाटांना मी विचारणा केल्यानंतर त्यांनी मला विचारलं की, हे हॉस्पिटल फक्त हिंदूंसाठीच आहे का? यावर मी त्यांना विचारलं की तुम्हाला असं का वाटतंय? माझ्या या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं की, "हे आरएसएसचं हॉस्पिटलं आहे ना?" यावर मी त्यांना सांगितलं की, हे सर्व समाजासाठी आहे. आरएसएसमध्ये धर्मावर आधारित अशा प्रकारचा भेदभाव चालत नाही.

यावेळी चर्चेदरम्यान मी त्यांना अनेक गोष्टी समजावून सांगितल्या त्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला, असंही यावेळी गडकरी यांनी सांगितलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply