RR vs LSG : कोण होईल आऊट कोणाची होईल एंट्री? जाणून घ्या, राजस्थान आणि लखनऊची प्लेईंग ११ अन् पिच रिपोर्ट

RR vs LSG : आज सवाई मानसिंग स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना होणार आहे. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. पण या सामन्यासाठी दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन कसे असतील? लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल खेळणार का? तसेच खेळपट्टीचा अहवाल आणि सामना कसा होईल याचा एक अंदाज आपण घेणार आहोत.

सवाई मानसिंह स्टेडियम फलंदाजांसाठी चांगलं असल्याचं मानलं जातं. या स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे आहे. फलंदाज सहज धावा करतात. गेल्या हंगामातही सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्ससमोर २१४ धावांचे लक्ष्य ठेवले होतं. या पिचवर सलग २०० हून अधिक धावांचे टार्गेट बनवण्यात संघांना यश आले आहे. या स्टेडियमवर संघांना आव्हानांचा पाठलाग करायला आवडते.

Andre Russell : गेल, कोहलीलाही पडला भारी; नावावर केला 'हा' विक्रम, बॉलिवूडचा 'पठाण'ही झाला खूश

आतापर्यंत झालेल्या ५२ आयपीएल सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी ३४ वेळा विजय मिळवला आहे. यामुळे जो संघ नाणेफेक जिंकेल तो संघ प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेईल, असा अंदाज आहे. दरम्यान आतापर्यंत लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स आयपीएलमध्ये तीनदा आमनेसामने आलेत. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सने २ वेळा विजय मिळवला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply