Royal Challengers Bangalore beat Punjab Kings by 60 runs : आयपीएल २०२४ च्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सपाठोपाठ पंजाब किंग्ज संघाचं आव्हान संपुष्टात आलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाबवर ६० धावांनी खणखणीत विजय मिळवला. या विजयासह बंगळुरूने प्लेऑफ्स अर्थात बाद फेरीच्या आशा जिवंत राखल्या आहेत. मात्र, पंजाबसाठी प्लेऑफचा रस्ता बंद झाला आहे. विराट कोहलीची ९२ धावांची खेळी बंगळुरूच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं.
बंगळुरूने कोहलीच्या ९२ धावांच्या खेळीच्या बळावर २४१ धावांची मजल मारली. अशा प्रकारे बंगळुरूने दिलेल्या २४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा डाव १८१ धावांतच आटोपला.गुणतालिकेत कोलकाता आणि राजस्थान प्रत्येकी १६ गुणांसह प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहेत. सनरायझर्स हैदराबादचा संघ १४ गुणांसह प्लेऑफसाठी संभाव्य आहे. चेन्नई, दिल्ली, लखनौ या तीन संघांचे १२ गुण झाले आहेत. प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरण्यासाठी या तीन संघात चुरस आहे. बंगळुरूच्या संघाचे आजच्या विजयासह १० गुण झाले आहेत. त्यांच्यासाठी प्लेऑफचा रस्ता कठीण आहे पण अशक्य नाही. मुंबई आणि पंजाब मात्र यांनी गाशा गुंडाळला आहे.
PBKS Vs RCB : विराटने पंजाबविरुद्ध रचला इतिहास, IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज |
पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोहलीने सलामीवीराच्या भूमिकेत खेळताना ४७ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह ९२ धावांची मॅरेथॉन खेळी केली. रजत पाटीदारने २३ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह ५५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. कॅमेरुन ग्रीनने २७ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावांची खेळी केली. फिनिशरच्या भूमिकेतील दिनेश कार्तिकने ७ चेंडूत १८ धावा केल्या आणि बंगळुरूने सव्वादोनशेचा टप्पा ओलांडला. पंजाबकडून हर्षल पटेलने ३ तर विदवथ कावेरप्पाने २ विकेट्स पटकावल्या.
पंजाबकडून रायली रुसोच्या ६१ धावांच्या खेळीचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. रुसोने २७ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ६१ धावांची वेगवान खेळी केली. शशांक सिंग (३७), जॉनी बेअरस्टो (२७) यांनी चांगली सुरुवात केली मात्र बंगळुरूने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. बंगळुरूकडून मोहम्मद सिराजने ३ तर स्वप्नील सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि करण शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. बंगळुरूने या सामन्यासाठी ग्लेन मॅक्सवेलऐवजी लॉकी फर्ग्युसनला संधी दिली तर पंजाबने कागिसो रबाडाऐवजी लायम लिव्हिंगस्टोनला संघात घेतलं होतं.
विराट कोहलीचे हुकले शतक –
विराट कोहलीने ४७ चेंडूंत ७ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९२ धावा करून बाद झाला. त्याला अर्शदीप सिंगने रायली रुसोच्या हाती झेलबाद केले. विराटचे नववे शतक हुकले. मात्र, या खेळीत त्याने अनेक विक्रम केले. त्याने केएल राहुलच्या आयपीएल हंगामात सर्वाधिक ६०० हून अधिक धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधली. दोघांनीही प्रत्येकी चार वेळा अशी कामगिरी केली आहे. विराटने कॅमेरूनसोबत ९२ धावांची भागीदारी केली.
शहर
- Mumbai : एमएमआरडीएचा ४० हजार १८७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर,मेट्रोसह अनेक प्रकल्पांना गती
- Pune : शाळा आता सकाळच्या सत्रात; का देण्यात आले निर्देश?
- Pune : विद्यापीठाच्या आवारात अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला कोठडी
- Baramati News : शिव'तारे बारामती पर...' ! शिवसेनेच्या आमदाराचा हटके सल्ला, शिंदेसेनेला हवाय अजितदादांचा बालेकिल्ला
महाराष्ट्र
- Beed : '... नाहीतर संतोष देशमुखांचा जीव वाचला असता', अपहरणाआधी नेमकं काय घडलं? कार चालकाने सांगितला घटनाक्रम
- Latur Crime : दुचाकीवर बसवून शेतात नेलं, ३ मुलींसोबत भयंकर घडलं; आजोबांकडून लैंगिक अत्याचार
- Udayanraje Bhosale : वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत उदयनराजे भोसले यांनी मांडली भूमिका; म्हणाले, “इतिहासात…”
- Baramati News : शिव'तारे बारामती पर...' ! शिवसेनेच्या आमदाराचा हटके सल्ला, शिंदेसेनेला हवाय अजितदादांचा बालेकिल्ला
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं