Rohit Pawar Tweet | रोहित पवार यांच्या नव्या ट्विटने खळबळ, तो संदर्भ देत म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतचा संशय आणखी गडद झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राहित पवार यांनी केला आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी सोशल मीडियावर ट्विट करत चौकशीची मागणी केली आहे.
बारामती येथील विमान अपघातप्रकरणी पायलटवर कोणत्या प्रकारचा दबाव होता का?, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. त्यांनी अहमदाबाद येथील अलीकडील दुर्घटनेचा संदर्भ देत, त्या प्रकरणात पायलटनेच इंधन स्विच (फ्युल स्विच) बंद केल्याची बातमी समोर आल्याचे नमूद केले.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पूर्वी व्यक्त केलेला संशय अधिक बळावल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *