Rohit Pawar : आताचे दादा आणि पूर्वीचे दादा फार वेगळे आहेत : रोहित पवार

Rohit Pawar : ''भाजप हा एक व्हायरस आहे आणि या भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना तो व्हायरस लागतो. आताचे दादा आणि पूर्वीचे दादा फार वेगळे आहेत कदाचित त्यांच्या मनात पवार साहेबांची भीती निर्माण झाली आहे. म्हणून ते बारामतीत'', असं बोलले, असं म्हणत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी भाजप आणि अजित पवारांवर टीका केली आहे.

याआधी बारामतीत भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकांना आवाहन केलं होतं की, ''आता लोक भावनिक करतील भावनेला बळी पडू नका, एवढे दिवस त्यांना (शरद पवार यांना) साथ दिली. आता आम्हाला साथ द्या.'' यावरच निशाणा साधत बीडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार असं म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray : उद्योगमंत्र्यांचे उद्योग आम्ही पाहतोय...' उदय सामंतांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी; नेमकं काय म्हणाले?

यावेळी ते म्हणाले की, ''अजित दादांकडून हे अपेक्षित नाही. जे दादा आम्ही पाहिलेत, ज्या दादांना आम्ही ओळखतो ते दादा फार वेगळे होते. ते भाजपबरोबर गेल्यानंतर भाजपचा विचार हा कुठेतरी त्यांना लागलाय की काय? असं म्हणावं लागेल.''

ते म्हणाले, ''नाहीतर अजून एक गोष्टीची भीती वाटते भाजपाला नाही तर दिल्लीतल्या लोकांना, कुठेतरी वाटावं की, आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात आम्ही काम करत आहोत. म्हणून अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन काही वक्तव्य होत असेल, तर हे योग्य नाही.''

रोहित पवार पुढे म्हणाले की, ''माझे एकच मत आहे, आपण सत्तेत आहात, सत्तेत तुम्ही शेतकऱ्यांना काय देतात? कष्टकऱ्यांना काय देतात ? विद्यार्थ्यांना काय देतात ? बेरोजगारी युवांसाठी तुम्ही काय करतात ? ते पाहिलं पाहिजे. सातत्याने तुम्ही वय काढत चाललात तर, यावरून असं दिसतंय की कुठेतरी त्यांच्या मनात भीती आहे. भाजपा व्हायरस आहे आणि तो व्हायरस कदाचित तिथे गेलेल्या नेत्यांना लागतो, असंच कुठेतरी आम्हाला म्हणावं लागेल.''



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply