Rohit Pawar : रोहित पवारांची तब्बल साडेआठ तास चौकशी, ‘ED’च्या कारवाईविरोधात प्रदेश कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

Rohit Pawar : राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज पुन्हा चौकशी केली. दुपारी साडेबाराच्या सुमारास रोहित पवार चौकशीसाठी ‘ईडी’ कार्यालयात दाखल झाले. तब्बल साडेआठ तासांच्या चौकशीअंती रात्री नऊच्या सुमारास ते कार्यालयाबाहेर आले. तत्पूर्वी रोहित यांची २४ जानेवारी रोजी ‘ईडी’ने चौकशी केली होती. गेल्या १० दिवसांत आज त्यांची दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांनी ‘ईडी’च्या कारवाईविरोधात प्रदेश कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली.

महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी रोहित पवार यांची चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी ५ जानेवारी रोजी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी रोहित पवारांच्या ‘बारामती अॅग्रो कंपनी’सह सहा ठिकाणी छापेमारी केली होती.

Samrudhhi Highway Accident News : समृद्धी महामार्गावर बसने दिली ट्रकला धडक; अचानक नीलगाय आल्याने अपघात

मिळालेल्या माहितीनुसार कन्नड सहकारी साखर कारखाना तोट्यात गेल्यानंतर त्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला होता. या लिलावासाठी इच्छुक कंपन्यांनी विविध बँकांतून पैसे कर्ज म्हणून घेतले होते. लिलावाच्या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात होता. त्या वेळी केवळ ५० कोटी रुपयांना ‘बारामती अॅग्रो’ने या कारखान्याची खरेदी केल्याचा आरोप आहे.

‘बारामती अॅग्रो’, ‘हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन इंडिया लि’. आणि ‘समृद्धी शुगर प्रा. लि.’ या कंपन्या लिलावात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये हायटेक कंपनीने लिलावासाठी जी प्राथमिक ५ कोटी रुपयांची रक्कम भरली होती, ती रक्कम त्या कंपनीने ‘बारामती अॅग्रो’कडून घेतल्याचा आरोप आहे. ‘बारामती अॅग्रो’ने कन्नड कारखान्याच्या खरेदीसाठी जी रक्कम दिली ती ‘बारामती अॅग्रो’ने विविध बँकांतून स्वतःच्या कंपनीच्या भांडवलासाठी घेतली होती; मात्र त्याचा वापर कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदीसाठी केल्याचा आरोप आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply