Republic Day 2023 : बारा वेळा पुरस्कार अन् बरंच काही, महाराष्ट्राच्या चित्ररथांचा रंजक इतिहास

 

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचालनात महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा राज्यातील साडेतीन शक्तिपिठे आणि स्त्रीशक्ती जागर अशी थिम ठरवण्यात आल्याचं राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी जाहीर केलं होतं. मात्र गणराज्यदिनीच्या चित्ररथाचा इतिहास तुम्हाला ठाऊक आहे काय? आज प्रजासत्ताक दिनी आपण चित्ररथाचा रंजक इतिहास जाणून घेऊया.

राज्याच्या वतीने दरवर्षी असे चित्ररथ उभारले जातात ज्यामधून महाराष्ट्राची अस्मिता ठळकपणे दिसावी. सन 1971 ते 2022 या 51 वर्षाच्या काळात महाराष्ट्राने 38 वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय परंपरेचे दर्शन घडवले आहे. आणि 12 वेळा उत्कृ्ष्ट चित्ररथाचा पुरस्कार पटकावलाय.

यावर्षीपासून राजपथावरील पथसंचालना सामील झालेल्या राज्यांच्या चित्ररथाला आणि मर्चिंग तुकडीला ऑनलाइन नोंदणीद्वारे मत देऊन जिंकविता येईल, असे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे. त्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पंथसंचलन संपल्यानंतर MyGov या पोर्टलवर ऑनलाइन मत नोंदणी सुरु झाली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला 'लोकपसंती'या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालेला असून महाराष्ट्राने चित्ररथाच्या सादरीकरणाच्या इतिहासातही सुवर्ण अक्षराने आपली अमित छाप सोडली आहे.

महाराष्ट्राच्या कोणत्या 12 चित्ररथांना मिळालेत पुरस्कार

महाराष्ट्राला लाभलेल्या वैविध्यपूर्ण  सांस्कृतिक-सामाजिक,पर्यटन, संत-वारी परंपरा आदी विषयांवर चित्ररथ सादर करण्याची संधी मिळालेली आहे.यात राज्याने 12 वेळा पुरस्कार पटकावले. वर्ष 1993 ते 1995 पर्यंत सलग तीन वेळा प्रथम पुरस्कार पटकावून विक्रम निर्माण केलाय.तर आतापर्यंत एकून सात वेळा प्रथम, तीन वेळा द्वितीय आणि दोन वेळा तृतीय पुरस्कार मिळालाय.

वर्ष 1981 आणि 2018 मधे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर आधारित चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. याआधी महाराष्ट्रात पोला या सणाला विशेष महत्व आहे. या विषयावर आधारित वर्ष 1983च्या चित्ररथाला पुरस्कार देण्यात आला होता. 1993 मधे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष या चित्ररथाला तर 1974 मधे फळाचा राजा 'हापूस आंबा'या चित्ररथाला आणि वर्ष 1995 मधे बापू स्मृती या चित्ररथाला असे तिनदा पुरस्कार मिळालेत. पंढरीची वारी या चित्ररथाला वर्ष 2015 मधे प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply