Ravindra Waikar : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करणार?

Ravindra Waikar : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर मागील अनेक दिवसांपासून एकनाथ शिदें गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. दरम्यान आज सायंकाळी आठच्या दरम्यान ते वर्षा निवासस्थानी दाखल होऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.

रवींद्र वायकर मागील आनेक दिवसांपासून तपास यंत्रणांच्या रडारवर वायकर होते. जोगेश्वरी पश्चिम उपनगर येथील ते आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाने एक मोठी ताकद एकनाथ शिंदेंच्या सोबतीला जोडली जाईल. गजानन किर्तीकर हे स्थानिक खासदार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने वायकरांसोबत काही स्थानिक नगरसेवक ही येण्याची शक्यता आहे.

Washim Accident : नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली; अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी

ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल पश्चिम उपनगराच्या दौऱ्यावर असताना जोगेश्वरीच्या शिवसेना शाखेत गेले होते. यावेळी ठाकरे यांचे स्वागत करताना वायकर यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. मात्र आता वायकरांचा शिंदे यांच्या शिवसेनेते तातडीने प्रवेश करण्याचा निर्णय झाला असल्याचे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावरती आहेत. हा दौरा आटोपून मुख्यमंत्री शिंदे आज सायंकाळी मुंबईत दाखल होतील. मुंबईत आल्यानंतर शिंदे यांच्या उपस्थितीत वायकरांचा पक्षप्रवेश होईल, असे सांगण्यात येत आहे. यामुळे ठाकरेंना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply