Ravindra Dhangekar On PM Modi : पुणेकरांचा पैसा प्रचारासाठी वापरला, आचारसंहिता भंग केली; मोदींच्या सभेवर रविंद्र धंगेकरांचा आक्षेप

Ravindra Dhangekar On PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये आज जाहीर सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ  यांच्या प्रचारार्थ पीएम मोदींची पुण्यातील रेसकोर्समध्ये ही सभा होणार आहे.

पीएम मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात जोरदार तयारी करण्यात आली आहे. अशामध्ये पीएम मोदींच्या या दौऱ्यावरून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी जोरदार टीका केली आहे. 'पुणेकरांचा पैसा प्रचारासाठी वापरला असून आचारसंहिता भंग केला.', असल्याचा आरोप रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.

Bomb Threat Mailed To Nagpur Airport : नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवणार, धमकीचा मेल; पोलिसांकडून मॉक ड्रिल

रविंद्र धंगेकर यांनी पुणेकरांचा पैसा प्रचारासाठी वापरत असल्याचा आरोप केला. तसंच, १० वर्षांत पुणेकरांवर आश्वासनांची खैरात केली. ४०० रुपयांचा गॅस ११०० रुपयांवर, ७० रुपयांचे पेट्रोल ११० रुपयांत. १० वर्षांत फक्त मुरलीधर मोहोळांच्याच संपत्तीत वाढ झाली. खर तर मोदींनी मुरलीधर मोहोळ यांनाच ईडी लावायला हवी होती.' असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसंच, 'नरेंद्र मोदी भाषण करतात की कॉमेडी कळतच नाही.', अशी देखील टीका त्यांनी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply