Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांचा मास्टर प्लान, पुणे शहराचं रुपडंच पालटणार; मतदारांना कोणती आश्वासने दिली?

Ravindra Dhangekar : पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा 'काटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. कारण, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. दुसरीकडे वसंत मोरे यांनी देखील वंचिकडून उमेदवारी मिळवली आहे. सध्या तिन्ही नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे.

तिरंगी लढतीत नेमकी कोण बाजी मारणार? याची उत्सुकता अनेकांना आहे. पुणे लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहेत. अशातच, पुणेकरांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी रवींद्र धंगेकर यांनी मास्टर प्लान आखला आहे.

Sanjay Raut : नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा.. संजय राऊतांचा मोठा आरोप; CM शिंदेंवर निशाणा

लोकसभेसाठी त्यांनी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यातून धंगेकर यांनी पुणे शहराचं रुपडं पालटणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. विशेष बाब म्हणजे, धंगेकरांनी पुण्यातील प्रमुख मुद्द्यांनाच काँग्रेसच्या हात दाखवला आहे.

शहरातील वाहतूक कोंडी, बिघडलेली काय आणि सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षा अशा मुद्द्यांवरून धंगेकरांनी मतदारांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय धंगेकरांनी आपल्या जाहीरनाम्यात शहरातील जल व पर्यावरण, सांस्कृतिक पर्यटन, आरोग्य आणि शिक्षणाबाबतचे मुद्दे मांडले आहेत.

दुसरीकडे, मुरलीधर मोहोळ यांनी देखील पुणेकरांना वेगवेगळी आश्वासने दिली आहेत. सध्या ते मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. मनसेला सोडचिठ्ठी देऊन वंचितकडून उमेदवारी मिळवणारे वसंत मोरे देखील निवडणुकीत मागे नाहीत. त्यांनी देखील आपला जोरदार प्रचार सुरू केला आहे.

धंगेकर यांच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

  • सार्वजनिक वाहतूक

  • ज्येष्ठ नागरिक

  • कायदा व सुव्यवस्था

  • नागरी सुरक्षा

  • आरोग्य

  • शिक्षण

  • जल व पर्यावरण

  • सांस्कृतिक पर्यटन

  • क्रीडा

  • उद्योग

  • श्रमिक असंघटित कामगार



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply