Ravindra Dhangekar : काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Ravindra Dhangekar : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे आमदार रवींद्र धंगेकर यांना भोवले आहे.

पुणे महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा झाला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 

 

रवींद्र धंगेकर यांच्याविरोधार कलम ३५३ नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील आशानगर येथे महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यासाठी महापालिकेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमातून कॉंग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करत रवींद्र धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकावले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply