Ravikant Tupkar Andolan : शर्वरी रविकांत तुपकरांसह शेकडाे शेतकरी पाेलिसांच्या ताब्यात, बुलढाण्यात दाखल हाेताच राजू शेट्टी म्हणाले

Ravikant Tupkar Andolan : शेतकरी, मजूर व तरुणांच्या न्याय हक्कासाठी, दुष्काळी मदत, पिकविमा, नुकसान भरपाई व सोयाबीन-कापसाला भाव मिळावा यासाठी आज (शुक्रवार) रविकांत तुपकर  यांच्या पत्नी शर्वरी तुवकर  यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर रेल्व स्थानकावर शेकडाे शेतक-यांनी रेल राेकाे आंदाेलन केले. या आंदाेलनाप्रसंगी तुपकर यांच्या पत्नीसह अनेक शेतक-यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. 

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज (ता १९ जानेवारी) रेल रोको आंदोलन छेडणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुपकर यांना शेगाव लोहमार्ग पोलिसांनी नोटीस बजावली हाेती. त्यावेऴी आंदाेलन हाेणारच असा निर्धार तुपकर यांनी व्यक्त करीत सरकारच्या दडपशाहीला मी अजिबात भीक घालणार नाही असे स्पष्ट केले हाेते.

MPSC Result : दुपारी मुलाखत, संध्याकाळी एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; विनायक पाटील राज्यातून प्रथम

तुपकरांच्या पत्नीसह शेकडाे कार्यकर्ते पाेलिसांच्या ताब्यात

दरम्यान आंदाेलनापूर्वी तुपकर यांनी पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी तुपकर यांनी मला ताब्यात घेतले तरी हे आंदाेलन थांबणार नाही असा इशारा पाेलिसांना दिला हाेता. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास तुपकर यांच्या पत्नी शर्वरी यांच्यासह शेकडाे शेतक-यांनी मलकापूर येथे रेल राेकाे आंदाेलन केले. त्यावेळी पाेलिसांनी तुपकर यांच्या पत्नीसह शेकडाे आंदाेलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

तुपकरांना पोलिसांना गुंगारा दिला पाहिजे हाेता : राजू शेट्टी

दरम्यान राजू शेट्टी म्हणाले यांनी सगळीकडे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आंदाेलन करत आहेत. आंदाेलनापूर्वी पाेलिस आंदाेलकांना ताब्यात घेत असतात याचा पूर्वानुभव आंदाेलकांना असताे. आंदोलन करायचेच असते तर तुपकर यांनी पोलिसांना गुंगारा देऊन रेल रोको आंदोलन करायला पाहिजे होते. थोडी गफलत झालेली दिसते. शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी आंदाेलन हाेणे गरजे हाेते असेही शेट्टींनी नमूद केले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply