Ravikant Tupkar : शेगावसह बुलढाणा जिल्ह्याला विकासाचे मॉडेल बनविणार : रविकांत तुपकर

Ravikant Tupkar : शेतकऱ्याचं पोरगं आता दिल्लीत पाठवायचंच असा निश्चय शेगाव येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या झालेल्या निर्धार मेळाव्यात  शेकडाे शेतक-यांनी तसेच नागरिकांनी केला. रविकांत तुपकर यांच्या शेगावातील मेळाव्याला घाटाखालील नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. यावेळी तुपकर यांनी उपस्थितांना शेगावसह जिल्ह्याला विकासाचे मॉडेल बनविणार असल्याची ग्वाही दिली.

गेल्या २२ वर्षांपासून घरादारावर तुळशीपत्र ठेवून चळवळीत काम करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे रविकांत तुपकर आहेत. शेतकरी, कष्टकरी, तरुण व सर्वसामान्य जनतेचा हा बुलंद आवाज यावेळी लोकसभेत पाठवायचा, असा निर्धार घाटाखालील रविकांत तुपकर यांच्या प्रमुख शिलेदारांनी संत गजानन महाराजांच्या पावनभुमित केला.

Maharashtra Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर प्रशासन सज्ज; २१ कक्षांची स्थापना

आता जातीपातीचे राजकारण बस झाले. विदर्भाची पंढरी असलेल्या संत नगरी शेगावसह बुलढाणा जिल्हा विकासाचे नवे मॉडेल बनले पाहिजे असा विकास या जिल्ह्याचा साधावा लागणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकजूट व्हावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी उपस्थितांना केले. यावेळी जेष्ठ नेते दयाराम वानखेडे यांनी मेळाव्यास उपस्थित राहून तुपकरांना शुभेच्छा दिल्या.

रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थिती शेगाव येथे घाटाखालील प्रमुख शिलेदारांचा निर्धार मेळावा धुमधडाक्यात पार पडला. शेगाव, खामगाव, जळगाव जामोद व संग्रामपूरमधील प्रमुख शिलेदारांनी या मेळाव्याला गर्दी केली होती.

सुरुवातीला शहरात समर्थकांनी मोठ्या उत्साहात बैलगाडीतून रविकांत तुपकरांची मिरवणूक काढली. शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण व शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या लोकसभेतील परिवर्तनाची लढाई ताकदीने लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply