Ravikant Tupkar : सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा, अन्यथा... रविकांत तुपकरांचा थेट इशारा

Ravikant Tupkar : राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा, अन्यथा १५ डिसेंबरनंतर सोयाबीन-कापूस आंदोलनाचा स्फोट होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या तसेच शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं.

बुलढाण्यात सलग ५ दिवस त्यांचं हे आंदोलन सुरू होतं. यादरम्यान, त्यांची प्रकृती सुद्धा खालावली होती. रक्ताचे पाट वाहिले तरी चालेल. मात्र मी आंदोलनावर ठाम आहे, शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात, असं तुपकरांनी म्हटलं होतं.

Maharashtra Politics : निवडणूक प्रचारात धर्माच्या नावाने मतं मागायची का? ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल

यानंतर तुपकर हजारो कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांसह मुंबईत देखील दाखल झाले होते. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मंत्रालय बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर तुपकरांनी आंदोलन मागे घेतलं होतं.

सरकारने आपल्या ७० टक्के मागण्या मान्य केल्या उर्वरीत मागण्यांसाठी आम्ही १५ दिवसांचा वेळ दिला आहे. असंही तुपकर म्हणाले होते. अन्नत्याग उपोषणानंतर तुपकर यांची प्रकृती देखील खालावली होती. त्यांना उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply