Ratnagiri Yellow Alert : रत्नागिरी जिल्ह्याला १९ जूनपर्यंत येलो अलर्ट; चिपळूण तालुक्यात जोरदार पाऊस

Ratnagiri : राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण परिसरातील रत्नागिरी जिल्ह्यात १९ जूनपर्यंत येलो अलर्ट जरी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर पहायला मिळत आहे. जिल्ह्याला १९ जूनपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात पाऊस कोसळताना पहायला मिळतोय. सर्वाधिक पाऊस हा डोंगराळ भागातील धरण क्षेत्र परिसरात पाहायला मिळत आहे. यात रात्रीच्या सुमारास चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. जवळपास दोन तास पावसाने तुफान बँटींग केली. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे नदी आणि नाल्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली.

Neet Result Controversy : नीट परीक्षेत गडबड झाली, सुप्रीम कोर्टात प्रकरण पोहोचल्यानंतर शिक्षण मंत्र्यांची कबुली

रात्री होत असलेल्या मुसळधार पावसामुळे इथल्या नागरीकांचा जीव टांगणीला लागला होता. कारण तिवरे दुर्घटना अद्यापही इथले नागरिक विसरलेले नाही. दोन तासांनी पाऊस थांबल्यानंतर इथल्या नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला. सहा वर्षापूर्वी या परिसरात मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे तिवरे येथील भेंदवाडी येथील मातीचे धरण फुटल्यामुळे जीवित व वित्त हानी झाली होती. त्यामुळे मुसळधार पाऊस पडल्यावर येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जीव मुठीत घेऊन राहतात. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply